धर्मस्थळाबद्दल सुरू असलेल्या अपप्रचारामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी केला आहे. गुरुवारी विजापूर येथे पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. या प्रकरणी भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारने हिंदू धर्माला धक्का पोहोचेल असे कोणतेही काम केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या सरकारच्या गॅरंटी योजना यशस्वी झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. ‘फुकटच्या योजना’ अशी टीका होत असली तरी, ५६ हजार कोटी रुपयांची स्त्री शक्ती योजना आणि २० हजार कोटी रुपयांच्या इतर योजनांवर एकूण एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments