वेगवेगळ्या सरकारी योजनांमधून मिळालेल्या तांदळाची बेकायदेशीरपणे साठवणूक करून त्याची वाहतूक करत असताना पोलिसांनी आणि अन्न निरीक्षकांनी संयुक्तपणे छापा टाकून दोघांना अटक केली.

ही घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील अर्जनाळ रस्त्यावर घडली. याप्रकरणी अर्शद दंडेवाले आणि हुसेन टपाल या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १० लाख रुपये किमतीचा एक ट्रक आणि ३,३९,६४० रुपये किमतीचे १२,१३० किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी झळकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments