Belagavi

बेळगाव : अझम नगरमधील रेणुकाश्रमात जत्रा उत्साहात

Share

बेळगावच्या अझम नगरमधील रेणुकाश्रमात जत्रा उत्साहात पार पडली. यावेळी उपवासाच्या व्रताची सांगता झाल्याने भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमाच्या गंगामाताजी यांनी एक महिना चाललेल्या उपवासाचे व्रत विधीवत पूर्ण केले.

श्रावण महिन्यात अझम नगरच्या रेणुकाश्रमात गंगामाताजी यांनी एक महिन्याच्या उपवासाचे अनुष्ठान केले होते. गुरुवारी विधीवत पूजा करून त्यांनी व्रताची पूर्ती केली. याच वेळी आश्रमातील भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, गोव्याचे श्रीनाथ गुरुजी, डॉ. यादवाड, विद्या वाली, वाय. एस. पाटील, राजशेखर मुरकीभावी, विजय कोटीवाले, महेश भाते, डॉ. बसवराज गोमानी, मल्लू कोटीवाले यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

Tags: