Hukkeri

३२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना संकेश्वर पोलिसांनी केली राजस्थानमधून अटक

Share

संकेश्वर पोलीस ठाण्यातील गुन्हे नोंदणी क्रमांक १९०/१९९३, कलम ३२३, ३२६ आणि ३४ आयपीसीनुसार गुन्हा दाखल असलेले आणि गेल्या ३२ वर्षांपासून फरार असलेले चार पैकी तीन आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर या आरोपींना संकेश्वर न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर ते जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर ते न्यायालयाच्या सुनावणीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे ते फरार घोषित झाले होते. राजस्थान राज्यातील भीलवाडा जिल्ह्यातील रोझी मंगरी खेड गावातील नारायण लाल हिरालाल गुज्जर आणि करणगड गावातील सुखलाल चौगालाल गुज्जर तसेच लखाराम चौगालाल गुज्जर यांना संकेश्वर पोलीस ठाण्याचे एएसआय सी.जे. सारपुत्रे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.आर. बेविनकट्टी यांनी एलपीआर वॉरंट घेऊन राजस्थानमधून शोधून काढले.

या आरोपींना संकेश्वर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, अशी माहिती संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशंकर अवुजी यांनी दिली.

Tags: