कर्नाटकचा विकास साधायचा असेल, दक्षिण कर्नाटकाप्रमाणेच उत्तर कर्नाटकातील लोकांनाही स्वावलंबी आणि सुखी जीवन जगायचे असेल, तर कृष्णा खोऱ्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत विजापूर शहर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केले.

बुधवारी विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी होऊन, यत्नाळ यांनी उत्तर कर्नाटकच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. कावेरी नदी ही आपलीच आहे, मात्र तिच्यातून केवळ २३ टक्के भागाला सिंचनाचा लाभ मिळतो. याउलट, कृष्णा नदीला ७२ टक्के भागाला सिंचन देण्याची क्षमता आहे. मात्र, दुर्दैवाने आपण या क्षमतेचा योग्य वापर करण्यात अयशस्वी ठरलो आहोत. उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कृष्णा नदीवरील प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले.
यासाठी कर्ज काढून का होईना, कृष्णा नदीवरील उप-प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. कर्नाटकचा विकास करण्यासाठी कृष्णा नदीवरील प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. दक्षिण कर्नाटकातील लोकांप्रमाणेच उत्तर कर्नाटकातील लोकांनाही सुखी आणि स्वावलंबी जीवन जगायचे आहे, असे ते म्हणाले.


Recent Comments