Belagavi

बेळगावात २२ ते २५ ऑगस्टदरम्यान भव्य रक्तदान शिबिर

Share

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाकडून २२ ते २५ ऑगस्टदरम्यान भव्य रक्तदान शिबिर आणि व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बी.के. अंबिका यांनी दिली.

गुरुवारी बेळगावमधील काळी आमराई येथील ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना बी.के. अंबिका म्हणाल्या, “आपल्या देशाला व्यसनमुक्त बनवणे गरजेचे आहे, कारण व्यसनांमुळेच भारताची अधोगती झाली आहे. भारत हा पूर्वी देव-देवतांचा सुंदर देश होता, पण आता तो नरकासमान झाला असून दुःख आणि अशांतीने भरलेला आहे. व्यसनांमुळे माणसाची चैतन्यशक्ती नष्ट होत आहे. आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल, तर वाईट सवयींपासून दूर राहायला हवे. म्हणूनच आम्ही रक्तदान शिबिर आणि व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.”

Tags: