कागवाड तालुक्यातील उगार खुर्द नगर परिषद प्रभाग क्रमांक १५ च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार नंदिनी सुजय फराकटे यांनी काँग्रेसचे उमेदवार विनायक कांबळे यांचा ३७ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या प्रभागाचे नगरसेवक सुजय फराकटे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. यात केवळ दोन उमेदवार रिंगणात होते. एकूण ७७४ पैकी ५७४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी नंदिनी फराकाटे यांना ३०६ मते मिळवून त्यांनी विजय संपादन केला.

विजय मिळाल्यानंतर नंदिनी फराकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘माझे पती सुजय फराकाटे यांनी या प्रभागासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या कामामुळेच मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत, मला दुसऱ्यांदा विजयी होण्यास मदत केली.’ असे त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल बोलताना त्यांनी माजी मंत्री श्रीमंत पाटील आणि भाजपचे युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा विजय शक्य झाला असे म्हटले. तसेच, ‘नगरसेवक राकेश पाटील, सदाशिव शिंगे, विक्रम धनगर, राजू कोरबू, सचिन तुवार, विनायक कामेरी, दिगंबर गवळी, अशोक कांबळे, बाबू होसमनी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच मला हा विजय मिळाला आहे.’ असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.


Recent Comments