Belagavi

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त बेळगावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Share

बेळगावात सिटी आणि तालुका फोटो व व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला.

कॅम्पमधील गणेशपूर रस्त्यावरील शानभाग हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात रोटरीचे सचिव शशिकांत नाईक यांनी मार्गदर्शन केले. छायाचित्रण हे केवळ मुद्रित माध्यमांपुरते मर्यादित न ठेवता, ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात राजा कट्टी यांनीही आपले विचार मांडले. ‘तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा खूप विकसित झाले आहे आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) छायाचित्रण क्षेत्रातही दाखल झाली आहे’, असे त्यांनी नमूद केले. सर्वच क्षेत्रांमध्ये एआयचा वापर होत असून, छायाचित्रकारांनीही वेळेनुसार स्वतःला अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा, असेही ते म्हणाले.

Tags: