विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात लच्याण येथे लिंगैक्य श्री सिद्धलिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रावण महिन्यात पाळणा-उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

उत्सवाच्या निमित्ताने मठात पहाटे लिंगैक्य श्री सिद्धलिंग महाराज, गुरु शंकरलिंग महा शिवयोगी आणि लिंगैक्य श्री संगनबसवा महा शिवयोगी यांच्या शिलामूर्तींवर भाविकांनी विशेष पूजा व अभिषेक केला. त्यानंतर मठातील कमरी मठाच्या सेवा समितीच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
सायंकाळी ५ वाजता बंथनाळ आणि लच्याण मठाचे पीठाधीश डॉ. वृषभलिंगेश्वर महाशिवयोगी, हुविना हिप्परगी येथील पत्रिवन मठाच्या मातोश्री द्राक्षायणी अम्मा आणि अगरखेड येथील श्री अभिनव प्रभु लिंग महास्वामी यांच्या उपस्थितीत परंपरेनुसार स्थानिक भक्त मल्लिकार्जुन संगीता मजगोंड यांच्या घराण्यातर्फे पाळणा-सेवा करण्यात आली.
या निमित्ताने त्यांच्या घरातून मठापर्यंत वाद्यांच्या गजरात श्री सिद्धलिंग महाराजांच्या चांदीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात परिसरातील हजारो महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना ‘घुगऱ्यांचा’ प्रसाद वाटण्यात आला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीत कक्काळमेली येथील सिद्धलिंगेश्वर भजन मंडळ आणि स्थानिक सिद्धलिंगेश्वर भजन मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला.


Recent Comments