यंदाचा रक्षाबंधन सण विजापूरमधील दिव्यांग मुलांनी एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार केला असून विजयलक्ष्मी सर्वोत्तम देशपांडे शिक्षण संस्थेतील या मुलांनी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी खास राख्या तयार केल्या आहेत.

या मुलांनी ५०० राख्या आणि शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत. त्यापैकी २०० राख्या विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंजाबमधील लष्कराच्या बटालियनला पाठवण्यात आल्या आहेत. सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा आणि त्यांना भावाच्या नात्याने राखी पाठवण्याचा हा विशेष उपक्रम खूप कौतुकास्पद ठरत आहे


Recent Comments