नाल्याचे अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या तयार केलेल्या भूखंडांवर अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत भूखंड माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सोमवारी, बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाचे आयुक्त शकील अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस कर्मचारी आणि प्राधिकरणाचे अभियंते, सहाय्यक अभियंते व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. बेळगाव शहराबाहेरील पिरनवाडी गावातील सर्व्हे नंबर ११३ आणि ११५ मधील जमिनींवर अनधिकृतपणे तयार करण्यात आलेले ले-आऊट आणि नाल्याचे अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईमुळे बेळगावातील अनधिकृत ले-आऊट आणि भूखंड तयार करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.


Recent Comments