बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुलिकट्टी गावातील सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळण्याच्या अमानवीय घटनेचा श्रीराम सेनेने तीव्र निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेतील आरोपींमध्ये श्रीराम सेनेच्या सौंदत्ती तालुका माजी अध्यक्षाला अटक झाल्याचे समजले आहे. मात्र, त्याने १६ एप्रिल २०२५ रोजीच संघटनेच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला होता आणि १८ एप्रिल २०२५ रोजी त्याला जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले होते. आमच्या संघटनेची अशी मागणी आहे की, या प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येकाची निष्पक्ष चौकशी करून, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी अशी मागणी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी यांनी केली.



Recent Comments