savdatti

सवदत्ती येथील स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव

Share

सवदत्ती शहरातील कुमारेश्वर रुद्रभूमीत किमान मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रुद्रभूमीत पथदिव्यांची व्यवस्था नसल्यामुळे सूर्यास्तानंतर संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे नागरिकांना मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश वापरून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तसेच पाण्याचा तुटवडा असल्याने यात आणखी भर पडली आहे. स्मशानभूमीत वीज आणि पाण्याची सोय नसल्याने स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांना मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नसल्याने पालिकेच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या स्मशानभूमीच्या जागेत तातडीने वीज आणि पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासकडे केली आहे.

Tags: