उत्तर कर्नाटकाची शक्तीदेवता असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या मंदिरात आज मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त कणकण विसर्जन विधी पार पडला.


सौंदत्ती येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात आज मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त कंकण विसर्जन विधी तसेच परडी भरण्याचा कार्यक्रम भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला. मंदिराचे मुख्य पुजारी महांतेश हिरेमठ यांच्यासह अनेक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले.


मार्गशीर्ष पौर्णिमेला कंकण विसर्जन विधी करण्यात येतो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने देवीच्या कंकण विसर्जनाचा विधी भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यल्लम्मा देवीची आराधना करणाऱ्या अनेक भाविकांकडून हि प्रथा पाळली जाते. येथील परंपरेनुसार या विधीचा एक भाग म्हणून गोडचीहून वीरभद्रेश्वर देवस्थानातून आणलेले हळदी-कुंकू अर्पण करून श्री रेणुका देवीला ‘राजमुक्ताई’चा शृंगार करण्याची परंपरा असून भाविकांच्या उपस्थितीत सर्व विधी उत्साहात पार पडले. यावेळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक ‘परडी भरण्याचा’ कार्यक्रम देखील पार पडला.


Recent Comments