राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शांतिनिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सोनं आणि कांस्य पदक जिंकून बेळगावचे नाव उज्वल केले आहे.

दि. ३ ऑगस्ट रोजी राजधानी बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बेळगाव येथील डिफेन्स स्कूल ऑफ इंडिया चे एकूण १२०० कराटे विद्यार्थी सहभागी झाले होते. १४ वर्षे वयोगटात गिरीश जंगण्णवर, सुकीत गलगळी, क्रांती पाटील, पृथ्वीराज देसाई, कृष्णा अळवाडी, प्रणयकुमार गोणी, समर्थ पाटील, ओम गावडे, अच्युत नायक यांनी सोनं आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे.या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कराटे मास्टर मधु पाटील, आकाश पाटील, मुनीर पाशा, प्रविण रंका, स्वाती वाळवे यांच्यासह खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे प्रोत्साहन लाभले.


Recent Comments