Belagavi

बेळगावमध्ये बांधकाम कामगारांचे पहिले जिल्हास्तरीय संमेलन उत्साहात

Share

बेळगाव मधील कन्नड साहित्य भवनात कर्नाटक राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेचे पहिले जिल्हास्तरीय संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राज्याध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी, नागप्पा संगोल्ली, दिलीप वाळके, सिटूचे अध्यक्ष गैबु जैनेखान, जी. व्ही. कुलकर्णी, राजू पाटील, मंदा नेवगी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी खजिनदार जी. व्ही. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘बेळगाव जिल्ह्यात बांधकाम कामगार संघटनेचा प्रवास कसा झाला, याबाबत त्यांनी माहिती दिली. कामगारांसाठी अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय आणि ४ ऑक्टोबर रोजी राजस्थानमध्ये अखिल भारतीय बांधकाम कामगार संघटनेचे संमेलन होणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून सर्व कामगारांना एकत्र आणून त्यांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांना सुविधा मिळवून देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

या संमेलनात वैशाली धुमाळे, तुकाराम यांच्यासह इमारत आणि इतर बांधकाम संघटनेचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: