Belagavi

चंदगडमधील वझर धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी

Share

दमदार पावसामुळे चंदगड तालुक्यातील सुंडी येथील वझर धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधब्याच्या पाण्यात भिजण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

डोंगराच्या कुशीतून वाहणाऱ्या या धबधब्यावर तरुण-तरुणींची वर्दळ वाढत असल्याने वझर पर्यटकांनी बहरला आहे.

या वर्षी वळीव पावसानंतर संपूर्ण जून महिनाही कोरडा गेला होता, त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, जुलैच्या मध्यंतरानंतर पावसाला सुरुवात झाली. परिणामी, नद्या, नाले आणि लहान धबधबेही प्रवाहित झाले आहेत. बेळगावपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुंडीच्या या धबधब्याकडे पर्यटकांची पाऊले वळत आहेत. विशेषतः शनिवार आणि रविवारी पर्यटकांची गर्दी वाढते. धबधब्याकडे जाताना दिसणारी हिरवीगार शेती आणि वनराई पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे तरुण नैसर्गिक धबधब्यासह हिरव्यागार शेतासोबत सेल्फी घेत आहेत. मुख्य ठिकाणी ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना मोहित करत आहे.

Tags: