टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स कंपनी आणि यूथ फॉर सेवा संस्थेच्या सहकार्याने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील १० सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या ३१५० विद्यार्थ्यांना मोफत शालेय कीटचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक मूलभूत सुविधा पुरवून उच्च शिक्षणावर भर देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. जे. शिवकुमार, डॉ. ज्योती कवळेकर, प्रवीण प्याटी आणि श्रीमती नीता गंगारेड्डी यांनी विविध शाळांमध्ये कीटचे वाटप केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, यूथ फॉर सेवा संस्था स्वयंसेवकांच्या माध्यमातून सरकारी शाळांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहे आणि याच अंतर्गत या वर्षी मुलांना मोफत कीटचे वाटप केले जात आहे.
या प्रसंगी टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स कंपनीचे प्रतिनिधी, यूथ फॉर सेवा बेळगाव जिल्ह्याचे संयोजक संतोष खोत आणि स्वयंसेवक हरीश, यलप्पा, समीक्षा, अनुषा, चैत्रा, समृद्धी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि स्थानिक समुदायाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments