टिळकवाडी, बेळगाव येथील पहिले रेल्वे गेटजवळ सुरू झालेले ‘बीएससी द टेक्स्टाईल मॉल’ गेल्या तीन वर्षांपासून कपडे खरेदीसाठी ग्राहकांचे पहिले आकर्षण बनले आहे. सर्वात कमी किमतीची हमी, वर्षभरातील १०% विशेष सूट आणि त्यांचा ‘श्रावण उत्सव डबल डिस्काउंट’ सेल ही या लोकप्रियतेमागील प्रमुख कारणे आहेत. बीएससी मॉलमध्ये नेमके काय आहे हे ‘डबल डिस्काउंट’?

बीएससी मॉलमध्ये १०% सूट तर नेहमीच उपलब्ध असते; त्यासोबतच आता ग्राहकांना या १०% सूट व्यतिरिक्त आणखी एक १०% विशेष सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा ‘डबल डिस्काउंट’ जुन्या स्टॉकवर नसून नव्याने आलेल्या सर्व फॅशनेबल कपड्यांवर लागू आहे.
याशिवाय, ‘डबल डिस्काउंट’ सेलमध्ये एक खास काउंटर आहे, जिथे साड्या, लेडीज वेअर आणि मेन्स वेअर अविश्वसनीय किमतीत उपलब्ध आहेत. हा मॉल १ लाख चौरस फूट आकाराचा पाच मजली असून, तो अतिशय सोयीस्कर ठिकाणी स्थित आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी फॅशनच्या कपड्यांचे विस्तृत पर्याय येथे उपलब्ध आहेत, तरीही ग्राहकांच्या वाढत्या गर्दीमुळे मॉल कमी पडत असल्याचे चित्र आहे. हा मॉल बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स या ८७ वर्षांच्या जुन्या वस्त्रोद्योगाच्या वारसा ब्रँडचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.

बीएससी मॉलमध्ये सर्व सण आणि लग्नाचा सीझन लक्षात घेऊन नेहमीच नवीन आणि खास फॅशनेबल स्टॉक ग्राहकांसाठी उपलब्ध केला जातो. तळमजल्यावर कॉटन आणि सिंथेटिक मटेरियलने बनवलेल्या साड्या, रेडिमेड ब्लाउज आणि मॅचिंग मटेरियलचा भव्य संग्रह दाखवला जातो. पहिल्या मजल्यावर फॅन्सी, डिझायनर आणि ब्रायडल साड्या, रेशमी साड्या, कांचीपुरम, धर्मावरम आणि बनारसी सिल्क साड्यांसह ब्रायडल लेहेंगा आणि गाऊनची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.
दुसऱ्या मजल्यावर खास महिलांसाठी तयार कपड्यांचा मोठा आणि आकर्षक साठा आहे, जिथे चुडीदार, लेडीज एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर, इनर वेअर, इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स आणि होम फर्निशिंग जसे की बेडशीट्स, टॉवेल्स, योगामॅट्स, ब्लँकेट, चादर, जमखाने इत्यादी साहित्य उपलब्ध आहे. ग्राहकांच्या तीव्र मागणीमुळे बीएससी मॉलने आता इमिटेशन ज्वेलरीसोबतच अस्सल चांदीची ज्वेलरी आणि चांदीत बनवलेल्या भेटवस्तूंचा एक विशेष विभाग सुरू केला आहे. या विभागातही नयनरम्य आणि आकर्षक दागिने तसेच भेटवस्तूंचा विस्तृत संग्रह आहे. दुसऱ्या मजल्यावरील या खास विभागाला भेट द्यायला विसरू नका.

तिसऱ्या मजल्यावर पुरुषांचे नामांकित मिल्सचे सुटिंग, शर्टिंग फॅब्रिक कलेक्शन, धोती सेट्स, सन्मान शॉल्स, हार, फेटे, गांधीटोपी, धोतर, पूजामडी यासोबतच मुलांसाठीही मोठा फॅशन संग्रह दाखवला जातो. येथे तुम्हाला नवजात शिशुंपासून ते वयस्कर व्यक्तींसाठीही कपडे मिळतील, तर लहान मुलांसाठी खेळणी आणि बोर्ड गेम्सही उपलब्ध आहेत. चौथा मजला केवळ पुरुषांसाठी समर्पित आहे, जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे फॉर्मल, एथनिक आणि पार्टी वेअरचे पोशाख उपलब्ध आहेत. यामध्ये शर्ट्स, पँट्स, जीन्स, कुर्ता पायजमा, शेरवानी, थ्री पीस, फाइव्ह पीस सूट, ब्लेझर, इनरवेअर, वॉचेस आणि परफ्यूम्स अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. हा मजला पूर्णपणे पुरुषांच्या खरेदीसाठीच बनलेला आहे.
विशेष म्हणजे, बीएससी मॉलमध्ये लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील आणि सर्व श्रेणींसाठी योग्य दरात कपडे उपलब्ध आहेत. म्हणूनच, बहुतेकजण म्हणतात की, “कापड म्हणजे बीएससी.” तर मग संपूर्ण कुटुंबाच्या खरेदीसाठी वाट कसली पाहताय? आजच भेट द्या पहिल्या रेल्वेगेटनजीक, टिळकवाडी बेळगाव येथील बीएससी मॉलला..


Recent Comments