बेळगाव तालुक्यात मुत्नाळ गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि एका भरधाव कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील महाराष्ट्रातील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.


मंगळवारी, बेळगावमधून हुबळीकडे निघालेली ही कार मुत्नाळ गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक तिचा टायर फुटला.

त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. या अपघातात कारमधील सहाही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

जखमींना तात्काळ ॲम्ब्युलन्सद्वारे नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे


Recent Comments