बेळगाव शहराच्या सदाशिवनगरमधील बेलदार छावणीत असलेल्या श्री मंगाई देवीच्या मंदिराच्या जत्रोत्सवाला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली.

बेलदार छावणीतील एका भक्ताने माहिती दिली की, दरवर्षी वडगाव येथील श्री मंगाई देवीच्या जत्रेच्या दिवशीच येथेही जत्रा भरवली जाते. सकाळी लवकर सुरू होणारी ही जत्रा रात्री उशिरापर्यंत चालते आणि हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

यात्राकाळात मंदिर परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. याचप्रमाणे देवीला विशेष आरासही करण्यात आली होती. यात्रा परिसरात विविध दुकाने, स्टॉल्स देखील लावण्यात आले होते. पहाटेपासूनच हजारो भक्तांनी फुलांचे हार आणि फळे घेऊन देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हे मंदिर जागृत देवस्थान मानले जात असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती.


Recent Comments