Belagavi

खरगपूरच्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये गोमटेश शाळेच्या विद्यार्थ्याची निवड

Share

बेळगावमधील गोमटेश विद्यापीठाच्या गोमटेश प्रौढशाळेचा विद्यार्थी मंजुनाथ रेवणकर याला देशातील प्रतिष्ठित कॉलेज खरगपूरमध्ये प्रवेश मिळालेला असून, संस्थेने त्याचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.

धीरज मंजुनाथ रेवणकर याने शालेय काळात इन्स्पायर अवॉर्ड मिळवून दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. रोटरी क्लबतर्फे दिला जाणारा 2023 चा बेस्ट स्टुडन्ट पुरस्कार मिळवला असून, एस.एस.एल.सी. परीक्षेत 625 पैकी 620 गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

आता खरगपूर कॉलेजमध्ये निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे अधिष्ठाता संजय बी. पाटील, संचालक सन्नथ कुमार, वृषभ पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच प्रशासन मंडळ, संस्थेतील सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: