दक्षिण कर्नाटकात ७० वर्षांहून अधिक काळ लोकप्रिय असलेली प्रसिद्ध ‘मावळ्ळी बिर्याणी’ आता बेळगावच्या खवय्यांसाठी उपलब्ध झाली आहे. राज्यभरात १६ शाखा असलेल्या मावळ्ळी बिर्याणीने आपली १७ वी शाखा बेळगावात सुरू केली आहे.

बेळगावातील बिर्याणीप्रेमींसाठी ही एक गोड बातमी आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याणीची चव चाखणाऱ्या बेळगावकरांना आता दक्षिण कर्नाटकातील सुप्रसिद्ध मावळ्ळी बिर्याणी आपल्या रुचकर बिर्याणीची चव चाखायला मिळणार आहे.

बेळगावातील कोल्हापूर सर्कल येथे मावळ्ळी बिर्याणीची १७ वी शाखा सुरू झाली आहे. आज बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि ‘बिग बॉस’ फेम तनिषा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ्ळी बिर्याणीच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी, बेळगाव शहरात प्रसिद्ध मावळ्ळी बिर्याणीने आपली नवीन शाखा सुरू केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आणि व्यवसायासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

तनिषा यांनी सांगितले की, मावळ्ळी बिर्याणी स्वतःच्या विशेष मसाल्यांचा वापर करून तयार केली जाते. दक्षिण कर्नाटकात लोकप्रियता मिळवल्यानंतर आता मावळ्ळी बिर्याणीने उत्तर कर्नाटकातील बेळगावात आपली १७ वी शाखा सुरू केली आहे. बेळगावकरांनी मावळ्ळी बिर्याणीची चव चाखायलाच हवी, असे आवाहन त्यांनी केले.

मावळ्ळी बिर्याणीचे संस्थापक बबलू गौडा यांनी सांगितले की, मावळ्ळी बिर्याणीची स्वतःची एक खास चव आहे आणि ती बेळगावकरांच्या पसंतीसही उतरेल. त्यांनी सर्वांना एकदा भेट देऊन मावळ्ळी बिर्याणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले.

यावेळी बेळगावचे मालक पवन, रवी यांच्यासह इतरही उपस्थित होते.


Recent Comments