Belagavi

बेळगावच्या 113 वर्षांच्या ऐतिहासिक न्यायालयीन इमारतीचे जतन करा

Share

बेळगाव शहरातील ११३ वर्षांचा इतिहास असलेल्या प्रथम अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारतीला पाडण्यापासून वाचवण्यासाठी बेळगावच्या भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

बेळगाव शहरातील प्रमुख ऐतिहासिक इमारतींपैकी एक असलेल्या या प्रथम अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारतीच्या पाडण्यासंबंधी नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. सुमारे ११३ वर्षांपूर्वीची ही इमारत शहरात न्याय आणि नागरी सेवांच्या दीर्घ परंपरेचे प्रतीक आहे. मात्र, आता ती पाडली जात असल्याची बातमी नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण करत आहे.

मुळगुंद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “ही इमारत बेळगावच्या ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शतकाहून अधिक इतिहास पाहिलेली ही इमारत शहराच्या धार्मिक, नागरी आणि कायदेशीर परंपरेचे प्रतीक आहे. या इमारतीची दुरुस्ती करून तिचा सार्वजनिक सेवा, सांस्कृतिक केंद्र किंवा हेरिटेज सेंटर म्हणून वापर करता येऊ शकतो. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून ही प्रक्रिया थांबवावी आणि इमारतीचे जतन करण्यासाठी पाऊले उचलावीत,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

Tags: