गुरुपौर्णिमेच्या विशेष निमित्ताने गौरी महिला मंडळाने मोठ्या उत्साहात ‘गुरुवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला डॉ. प्रतिज्ञा रचनाईकर आणि श्रीमती प्रतिभा कळ्ळीमठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या आणि त्यांनी मार्गदर्शन केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. महादेवी हागरगी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात गौरी पाटील, जयलक्ष्मी बाळेकुंद्री, स्नेहल काळभैरव, जयश्री हरकुणी, नेहा किशन आणि विनोदा होंगल या शिक्षिकांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

मंडळाच्या अध्यक्षा डॉ. महादेवी हागरगी, उपाध्यक्षा शशिकाला जगजंपी, सचिव सुजाता गोकाक, तसेच जयश्री कराडकर, सविता पाटील, प्रेमा येत्तिनमनी यांच्यासह सर्व सदस्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता शेट्टी यांनी केले, तर लता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.


Recent Comments