Belagavi

‘डॉ. एस.पी.एम. रोड’ गणेशोत्सव मंडळातर्फे सामाजिक उपक्रम

Share

बेळगावातील डॉ. एस.पी.एम. रोड, आठले गुरुजी रोड आणि शास्त्री नगर येथील मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मंडळाने अनेक सामाजिक कार्यक्रम हाती घेतले आहेत.

आज बेळगावातील गुजरात भवन येथे मोफत आरोग्य तपासणी, दृष्टी तपासणी आणि रक्तदान शिबिर यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक रहिवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण ४६ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुजरात भवनचे अध्यक्ष रामेश लताड, सचिव विजय भानुशाली आणि गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील राव उपस्थित होते.

आरोग्य तपासणी महात्मा फुले रोडवरील युनिकेअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने केली. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. नूतन कंग्राळकर यांनी नेत्र तपासणी केली. रक्तदान शिबिर महावीर ब्लड बँकच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

Tags: