Belagavi

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राजहंसगड येथे म्हम्हत्याचा, महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात पार पडला

Share

सालाबादप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी वारी निमित्त राजहंसगडातील वारकरी व भाविक पंढरपूरला वारी करून येऊन रीती रिवाजाप्रमाणे गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात म्हम्हत्याचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. या दिवशी सकाळपासुनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर स्वच्छ करून पूजा अर्चा करून दिवसभर मंदिरात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता आरती करून संपूर्ण गावाला महाप्रसादाचे आयोजन केले होते, त्यामुळे गावकऱ्यांनी सायंकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर भजनी मंडळाने भजन वगैरे करून या कार्यक्रमाची सांगता केली तत्पूर्वी……..

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दररोज नित्य सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांच्या कार्याची घेतली विशेष दखल……..
राजहंसगड गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात दररोज स्वच्छता राखण्यासाठी झाडू मारणे, पाणी मारणे, रांगोळी काढणे, तसेच मंदिर गाभाऱ्यातील मूर्तींना दररोज विधीवत पूजा अर्चा करणे अशा प्रकारची विविध सेवा मागील अनेक वर्षांपासून विना मोबदला सेवा करणाऱ्या सेवेकरी सौ.सुभद्रा मल्लापा कुंडेकर
ह.भ.प.श्री सिद्धाप्पा देवाप्पा हावळ ह.भ.प. श्री तुकाराम सिद्धाप्पा पुनजकर या सेवेकऱ्यांचा हार, शाल, श्रीफळ, पानविडा, व फेटा बांधून कार्यक्रम स्थळी विशेष सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील सर्वात वयस्कर व जेष्ठ नागरिक म्हणून श्री जिवापा गुंडू पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

राजहंसगड गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील हा म्हम्हत्याचा, महाप्रसादाचा व सेवेकऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार सोहळा पार पाडण्यासाठी गावातील माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष
श्री दत्ता पवार माजी तालुका पंचायत सदस्य ह.भ.प.
श्री सिद्धाप्पा छत्रे, शंकर हालगेकर, भावकांन्ना कंणबरकर, मारुती तावशे, लक्ष्मण चव्हाण, परशराम निलजकर, पिंटू कुंडेकर, सिद्धाप्पा बिर्जे, सिद्धाप्पा जाधव, शेखर हिरेमठ सह अनेकांनी परिश्रम घेतले.

त्याचप्रमाणे या मंदिरात अविरतपणे निस्वार्थ सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांच्या कार्याची तत्पर दखल घेऊन त्यांचा सेवेची पोचपावती म्हणून त्यांचा गौरव केल्याबद्दल या दिंडी व भजनी मंडळाचे चालक ह.भ.प.
श्री सिद्धाप्पा देमाना छत्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचेही गावातील जाणकारांनी भरभरून कौतुक केले…..🚩🚩

Tags: