बस्तवाड येथील मराठा मंडळ संचलित हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप आणि सुवर्णतातताई मोदगेकर यांच्या १६ व्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सदस्य राम काकतकर यांनी भूषवले. यावेळी मराठा मंडळ ट्रस्ट समितीचे उपाध्यक्ष रामचंद्रराव मोदगेकर, एस.डी.एम.सी. अध्यक्ष शिवाजी काकतकर, प्रकाश देसाई, रमेशराव मोदगेकर, शाळेचे मुख्याध्यापक विजय खांडेकर, किरण मोदगेकर, सुरज मोदगेकर, तसेच शिक्षक परशुराम लोहार, दीपा चौगुले, सायली गुरुव, बी.बी. पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments