Belagavi

मुलांच्या भांडणातून पालकांची हाणामारी

Share

शाळेतील मुलांच्या भांडणातून पालकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी बेळगाव न्यायालयाजवळ घडली.

न्यायालयात खटला सुरू असल्याने, हजर झाल्यानंतर चहा पीत असताना सोहेल इनामदार आणि अन्य एका व्यक्तीने जहीर अब्बास हुक्केरी यांच्यावर अचानक दगड आणि विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या जहीर हुक्केरी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

या घटनेबाबत संजू वाजंत्री यांनी सांगितले की, “न्यायालयात आमची तारीख होती. तारीख संपवून आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो असताना दोन व्यक्ती आले आणि त्यांनी अचानक हल्ला करण्यास सुरुवात केली. मी सोडवण्यासाठी गेलो असता, मलाही मारहाण करण्यात आली. चार दिवसांपूर्वी शाळेत मुलांमध्ये भांडण झाले होते,” असे त्यांनी सांगितले.

Tags: