बेळगावच्या गोवावेस भागात शॉर्ट सर्किटमुळे एका हॉटेलला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेळगावातील गोवावेस येथील “हॉटेल अनुग्रह” मध्ये काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हॉटेलमधील फर्निचर जळाल्याचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी जागे झाले आणि त्यांनी तात्काळ हॉटेल मालक सुधाकर पुजारी यांना माहिती दिली. तसेच, अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

अग्निशमन दलाला माहिती मिळताच, कर्मचारी पाण्याच्या टँकर्सह तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अथक प्रयत्नांनी आग विझवली. मात्र, तोपर्यंत हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, काउंटर आणि इतर सर्व फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाले होते.

मध्यरात्री ही दुर्घटना घडल्यामुळे हॉटेलमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. हॉटेल मालक सुधाकर पुजारी यांनी ‘इन न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या २५ वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करत असून, या घटनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलो असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments