बेळगाव शहराच्या कोल्हापूर सर्कलजवळ गुरुवारी एका भिक्षुकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच पडक्या इमारतीत या भिक्षुकाचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस आणि ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. उत्तरीय तपासणी आणि पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे.


Recent Comments