बळ्ळारी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या बेळगावच्या हॉकी सब-ज्युनियर संघाला आज निरोप देण्यात आला. हा संघ हरिप्रिया एक्सप्रेसने बळ्ळारीकडे रवाना झाला.

ही हॉकी स्पर्धा २ ते ६ जुलै दरम्यान खेळवली जाईल. या संदर्भात अधिक माहिती अशी की, बेळगाव संघात यशवंत भजंत्री, अशोक येळ्ळूरकर, भैरू आरे, समर्थ अकोल, समर्थ करडीगुद्दी, आर्यन घगने, फायजल, रोहित घुगरी, पार्थ कड्लास्कर, आदर्श अमाती, अयान चोपदार, फैजान मानेर, शशांक माळी, बेविंगडद, मुरुगेश कोटी, पवन कुमार गुगरी, श्रेयस नेरूरु, कृष्णराज रोट्टी, विराज बेळगाव, आनंद गदग, गोपाल शेट्टिगिरी, आदित्य पटशेट्टी, शिवराज बिरादार, सुजन वासन, पवन बोरण्णावर या खेळाडूंचा समावेश आहे. संघासोबत व्यवस्थापक सुधाकर चल्के आणि गणपत गावडे हे देखील गेले आहेत.
यावेळी बेळगाव हॉकी क्लबचे अध्यक्ष गुळप्पा होसमानी आणि सक्रिय सदस्य प्रकाश कालकुंद्रीकर, विकास कलघटगी, सविता वेस्ने, संदीप पाटील, उत्तम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर संघाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
फेसबुक फ्रेंड सर्कल, व्हीआरके फाउंडेशन, संतोष दारेकर, ओम अन्वेकर, आदित्य अन्वेकर आणि श्रीनिवास बातुलकार यांनी या हॉकी संघाच्या प्रवासाचा खर्च प्रायोजित केला आहे. कँटोनमेंट शाळेचे हॉकी प्रशिक्षक साकीब बेपारी यांनीही संघाला शुभेच्छा दिल्या.


Recent Comments