बेळगावच्या मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध वाहतूक विरोधी दिन साजरा करण्यात आला.


या दिनानिमित्त जनजागृती करण्याच्या उद्देशाने, पॉलिटेक्निकमधील सर्व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन आयुष्यात कधीही न करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहात ही प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला प्राचार्य आर.

एस. सूर्यवंशी, उपप्राचार्य ए. पी. थोरवी, एन.एस.एस. समन्वयक बी. आर. पावटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments