खानापूर तालुक्यात कणकुंबी चेकपोस्टजवळ एका व्यक्तीवर अस्वलाने भीषण हल्ला केला असून, गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

दशरथ वरंडिकर (६०) हे बुधवार सकाळी आपली जनावरे जंगलाच्या सीमेवर चरण्यासाठी सोडून परत येत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून सदर व्यक्तीला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खानापूर वन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.


Recent Comments