Belagavi

अभिनेते सयाजी शिंदे यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट

Share

बहुभाषिक अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज बेळगावातील शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन, तेथील वृद्धांसोबत वेळ घालवला.

आज बेळगावात आलेले बहुभाषिक अभिनेते सयाजी शिंदे यांनी शांताई वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकताच प्रदर्शित झालेला आपला ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी शांताई वृद्धाश्रमाचे प्रमुख विजय मोरे, प्रसाद प्रभू आणि गंगाधर पाटील यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी सयाजी शिंदे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि आपुलकीने शांताई वृद्धाश्रम चालवणाऱ्या मोरे कुटुंबाच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी मारिया मोरे, चेरल मोरे, निलेश रामगावड, शंकर पायन्नाचे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: