बेळगावच्या रहिवासी रूपा वेर्णेकर यांना नुकताच ‘योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छ्त्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २२ जून रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हा कार्यक्रम आयुष आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट), तसेच आयुष विभागाच्या डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, उद्योजक मनोज दांडगे, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राजे पाटील, डॉ. सतीश कराळे, डॉ. बाबूराव कानडे, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्रोफेसर कुणाल महाजन, मनोहर कानडे, पद्मा वेर्णेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments