वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन निर्मित ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, मंगळवार, २४ जून रोजी, चित्रपटाची टीम बेळगावला भेट देणार आहे.

मंगळवारी, २४ जून रोजी चित्रपटाची टीम बेळगावातील क्लब रोडवरील ज्योति कॉलेज, नेहरू नगर येथील मराठा मंडळ कॉलेज आणि गोवावेसमधील मराठा मंदिर हॉल येथे भेट देईल.

या टीममध्ये सुप्रसिद्ध बहुभाषिक कलाकार सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, नक्षत्र मेढेकर, सायली फाटक, अमायरा गोस्वामी, दिग्दर्शक योगेश जाधव, कार्यकारी निर्माता संजय ठुबे आणि उत्पादन नियंत्रक विनय जवळीकर यांच्यासह इतर सदस्य सहभागी होणार आहेत.


Recent Comments