Belagavi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) पक्षातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) पक्षातर्फे 59 व्या शिवसेना वर्धापन दिन निमित्त सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्र. 5 वडगांव येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम दि. 19 रोजी 2025 रोजी दु. 12 वाजता पार पडला.

वह्या, कंपास, पेन्सील बॉक्स व मिठाई संपूर्ण विद्यार्थ्यांना 1 ली ते 7 वी पर्यंत 160 विद्यार्थीनींना वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी शिवसेनेबद्दल मराठी प्रेम किती आहे आणि पक्षाची शिस्त काय आहे याबद्दल माहिती दिली. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, उपशहरप्रमुख प्रविण तेजम, युवा सेनेचे विनायक हुलजी, चेतन गंगधर, प्रदीप सुतार, अमर कडगांवकर, आनंद गोंधळी, प्रतिक देसुरकर, सक्षम कंग्राळकर, अवधुत कंग्राळकर, मल्हारी पावशे, प्रकाश हेब्बाजी, मयुरेश काकतकर उपस्थित होते.

शाळेचे शिक्षक नितीन बेनके यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षिका विजय रसाळ, दिपा देसुरकर, के. व्ही. कुंटे, माधुरी पाटील, आशा शिक्षक वृंद उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन वैशाली पाटील केले. विद्यार्थीनीना एकूण 600 वह्या, 150 कंपास, 25 बॉक्स पेन्सील व मिठाई देण्यात आली.

बंडू केरवाडकर उपजिल्हाप्रमुख

Tags: