Belagavi

बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे ऑटोमोबाईल दुकान जळून खाक!

Share

शॉर्ट सर्किटमुळे बेळगावातील फोर्ट रोडवरील एका ऑटोमोबाईल दुकानाला आग लागून ते पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

बेळगाव शहरातील फोर्ट रोडवरील ऑटोमोबाईल दुकानाला काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामुळे लाखो रुपयांचे टायर आणि वाहनांचे सुटे भाग जळून भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यात यश मिळवले.

आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: