बेळगाव तालुक्यातील नंदीहळ्ळी गावात श्री कल्मेश्वर मंदिराच्या नूतन बांधकामासाठी निधी मंजूर करण्याबाबत ग्रामस्थांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन दिले आहे.

नंदीहळ्ळी येथील श्री कल्मेश्वर मंदिर सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ते कधीही कोसळू शकते अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, नवीन मंदिराच्या बांधकामासाठी ४० लाख रुपयांचे अनुदान त्वरित मंजूर करावे, अशी मागणी कायदेतज्ज्ञ मारुती कामण्णाचे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे केली.
यावेळी निवेदन सादर करताना विजय सांब्रेकर, अमित कदम यांच्यासह अन्य प्रमुख गावकरी उपस्थित होते. मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments