जागतिक रक्तदान दिनानिमित्त बेळगाव येथील कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावच्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सामान्य रुग्णालयात जागतिक रक्तदान दिनानिमित्त हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये कॅन्टोनमेंट बोर्डाचे रुग्णालय, शाळा आणि कार्यालयातील कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि इतरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबिरात सुमारे ३३ हून अधिक बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सामान्य रुग्णालयाचे आर.एम.ओ. आर. व्ही. अनगोळ यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू आणि मलेरियासारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. अशावेळी रुग्णांना रक्ताची खूप गरज असते. रक्ताचे महत्त्व ओळखून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. आणीबाणीच्या परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते आणि एका बाटली रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवता येतो, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी सदस्य साजीद शेख यांच्यासह अनेकांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.
Recent Comments