Belagavi

बेळगावात उद्या ‘काहेर’चा १५वा दीक्षांत समारंभ

Share

बेळगावच्या के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचा १५वा दीक्षांत सोहळा ३ जून रोजी आयोजिण्यात आल्याची माहिती के.एल.ई.चे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.

आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्याच्या पदवीदान समारंभाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत् प्रकाश नड्डा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत डॉ. श्रीशैल श्रीखंडे आणि डॉ. प्रभाकर कोरे स्वतः उपस्थित असतील. ‘काहेर’चे कुलगुरू डॉ. नितीन गंगाणे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. चंद्रा मेटगुळ आणि डॉ. एम.एस. गणाचारी विशेष प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. कोरे यांनी नर्सिंग शिक्षणाबद्दल बोलताना सांगितले की, नर्सिंगच्या प्रशिक्षणासाठी प्रात्यक्षिक अभ्यासाची अत्यंत आवश्यकता असते. के.एल.ई. नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन परिपूर्ण ज्ञान प्रदान करते. यामुळेच, येथील शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशापेक्षा परदेशात जास्त सेवा देत आहेत.

Tags: