Belagavi

मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवल्याचा जाब विचारल्याने तरुणावर चाकूहल्ला

Share

बेळगाव येथील कणबर्गी परिसरात सोमवारी क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर तिघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

कणबर्गी येथे सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. मंजुनाथ नावाच्या तरुणावर हा हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथने काल रात्री दारू पिऊन बेधुंदपणे दुचाकी चालवणाऱ्या तिघांना हटकले होते. याच कारणावरून आज सकाळी या तिघांनी मिळून मंजुनाथवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याला चार-पाच ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: