बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर येथील व्यापारी गाळ्यांना सध्या ‘ग्रहण’ लागल्याचे दिसत आहे. एका बाजूला योग्य लिलाव बोली न आल्याने नगर पंचायत गाळे देण्यास कचरत आहे, तर दुसऱ्या बाजूला नगर पंचायतीच्या या विलंब धोरणामुळे व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर येथे २०२३ मध्ये २ कोटी ६० लाख रुपये खर्चून ४२८० स्क्वेअर फूट परिसरात व्यापारी गाळे बांधण्यात आले होते, ज्यांचे उद्घाटन दोन वर्षांपूर्वीच झाले आहे. मात्र, या व्यापारी गाळ्यांना ‘ग्रहण’ लागल्यासारखे झाले असून, त्यांना योग्य किंमत मिळत नाहीये. यामुळे तीन मजली असलेले हे ‘केएसआर’ व्यापारी संकुल आता एका पडक्या इमारतीत रूपांतरित झाले आहे.
गेल्या आठवड्यातच लोकापूर नगर पंचायतीने लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. परंतु, या लिलावात अनियमितता आढळून आली. त्यामुळे नगर पंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की, लिलावात योग्य दर न मिळाल्याने तो रद्द करण्यात आला आहे.


Recent Comments