कियॉनिक्स संस्थेची परवानगी रद्द होऊनही तिच्या नावाचा गैरवापर करत, आणि सरकारची कोणतीही परवानगी न घेता कंम्प्युटर प्रशिक्षण संस्था चालवून, अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याबद्दल लक्ष्मी-उदय शेट्टी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वकील राजू शिरगांवी यांनी दिला आहे.

आज बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगावच्या नेहरू नगरमध्ये लक्ष्मी उदय शेट्टी आणि उदयकुमार शेट्टी हे ‘शार्प कंम्प्युटर सेंटर’ चालवत आहेत. त्यांना सुमारे 20 वर्षांपूर्वी कियॉनिक्स कंम्प्युटरने फ्रँचायझी दिली होती. मात्र, 2013 मध्ये सरकारने ही फ्रँचायझी रद्द केली असून, आता त्यांना कोणतीही सरकारी परवानगी नाही. तरीही ते कियॉनिक्स संस्थेच्या नावाने एससी/एसटी विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन त्यांना प्रशिक्षण देत आहेत.
उदयकुमार शेट्टी हे कियॉनिक्स संस्थेत उच्च अधिकारी असल्याचे खोटे सांगून त्यांनी बेळगाव क्लबचे सदस्यत्वही मिळवले आहे. त्यांच्या विरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयात आरोपपत्र देखील सादर करण्यात आले आहे. असे असूनही, त्यांनी त्यांच्या संस्थेवरील कियॉनिक्स लिहिलेला फलक काढलेला नाही. जर कियॉनिक्सच्या एम.डी.ने हा फलक काढण्यास दुर्लक्ष केले, तर दलित संघटनांच्या वतीने ‘तामटे’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिरगांवी यांनी दिला.


Recent Comments