बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील लक्ष्मी नगर येथे खेळताना पाय घसरून विहिरीत पडल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अक्कियार झारे (वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे. तो मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना चेंडू विहिरीच्या बाजूला गेला. चेंडू आणण्यासाठी गेलेला अक्कियार अचानक पाय घसरून विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.


Recent Comments