Belagavi

बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंचा मंत्री सतीश जारकीहोळींकडून सत्कार

Share

थलापती क्लासिक २५ दि विभाग आंतरराज्य शरीरसौष्ठव स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत, आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेल्या बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंचे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अभिनंदन केले आहे.

तामिळनाडूतील सेलम येथे झालेल्या थलापती क्लासिक २५ दि विभाग आंतरराज्य स्पर्धेत बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये प्रताप कालकुंद्रिकर यांना रौप्यपदक, वेंकटेश ताशिलदार यांना रौप्यपदक, अफरोज ताशिलदार यांना रौप्यपदक, तर किरण वाल्मिकी यांनी चौथे स्थान पटकावून आशियाई स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कौतुक केले. यावेळी आय.बी.बी.एफ. ऑर्गनायझिंगचे सचिव अजित सिद्धण्णावर, बी.डी.बी.बी.ए.चे अध्यक्ष एम. गंगाधर आणि बी.डी.बी.बी.ए.चे सदस्य नागराज कोळकार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: