Belagavi

नागरिक हक्क संरक्षण दिन : दलित संघर्ष समितीची बेळगावात बैठक

Share

येत्या ९ जून रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय “नागरिक हक्क संरक्षण दिन” कार्यक्रमासाठी बेळगाव जिल्ह्यातून ५०० कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती दलित संघर्ष समिती बेळगाव जिल्हा समितीने दिली.

कर्नाटक दलित संघर्ष समिती (आंबेडकरवादी) जिल्हा समितीने “नागरिक हक्क संरक्षण दिन” कार्यक्रमाच्या तयारीसाठी बेळगावात एका खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतली. राज्याचे कोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे आणि जिल्हा संयोजक महांतेश तळवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.

या बैठकीत ९ जून रोजी होणाऱ्या बहुजन मुक्तीदाते प्रा. बी. कृष्णप्पा यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त आयोजित “नागरिक हक्क संरक्षण दिन” कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातून ५०० लोकांना घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी राज्य कोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे, जिल्हा संयोजक महांतेश तळवार, नागेश कामशेट्टी, शशी साळवे, मनोहर अज्जनकट्टी, रामप्पा चव्हाण, नारायण पाटील, अशोक लाखे, श्रवण कांबळे आदी उपस्थित होते.

Tags: