बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहर आणि परिसरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.


हिरण्यकेशी नदीमुळे संकेश्वर शहर आणि आसपासच्या भागांत निर्माण होणाऱ्या पूरसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर शहरातील नदीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. मंत्र्यांच्या या भेटीमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.


Recent Comments