मंगळवार दि. २७ मे रोजी श्री शनेश्वर जयंती असून त्या निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री शनी देवाचा जन्मकाल आहे.जन्मकाल झाल्यावर रुद्राभिषेक करण्यात येणार आहे.त्या नंतर सकाळी आठ वाजता, अकरा वाजता आणि दुपारी एक वाजता तैलभिषेक करण्यात येणार आहेत. दुपारी महापूजा झाल्यावर अलंकार सेवा करण्यात येणार आहे. शनी जयंतीच्या निमित्ताने शनी शांती, शनी होम, तीळ होम आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण दिवसभर मंदिरात भक्तांना प्रसाद वितरण करण्यात येणार आहे असे मंदिराचे ट्रस्टी निरंजन अध्यापक यांनी कळवले आहे.



Recent Comments